Sunday, October 5, 2008

A poem...

॥राष्ट्रीय स्वयंसेवक संघ॥

काही वर्षांपूर्वी एका ७ दिवसांच्या वर्गाला लिहिलेली ही कविता...

स्थळ: सानपाडा, मुंबई
प्रसंग: प्राथमिक वर्गाच्या रंजन बैठकीसाठि केलेली कविता

निवेदन: ह्या कवितेमद्द्ये काही जड़ शब्द आहेत। परन्तु मी सर्व शिक्षकांना विनंती करतो की त्यांनी ते जेवणासोबत पचवून घ्यावे!

त्रासच त्रास आमच्या वाटी आले
परन्तु त्याच दुःख नाही कारण
मित्रच मित्र आमच्या ताटी आले॥

सकाळी मुशी आनी जोशी, दर्शन देत होते,
दक्ष-आरम, पदविन्यांसाचे धडे घेत होते।।

घरी मटन मछीच खात होतो,
इथे पाला पाचोलाही पचवत होतो॥

एक मागुन एक दिवस, आम्ही मोजत होतो,
दिवस कसे सरतील ह्याचा, विचार करत होतो॥

सात दिवस फ़क्त शाळेच्या भिंती,
बाहेर जायचं म्हटलं की मुशिंची भीती।।

पण आज उमगलं, आम्ही किती चुकत होतो,
खुप चांगल्या गोष्टी, आम्ही इथे शिकत होतो॥

उद्या आपण आपल्या घरी असूं ,
एकमेकांची आठवण करून, गालातल्या गालात हसू।।

- गिरिराज पै वेर्णेकर


No comments: