Monday, October 6, 2008

Another Poem.. (For my mom's 50th Birthday)

This poem was written in the year 1999, when I was barely 15 years old on the occassion of my Mom's 50th Birthday.

मी इयत्ता बारावित होतो। लोक म्हणायचे हा मुलगा साहित्याच्या क्षेत्रात नाव कमवेल। झालं मात्र वेगळंच। अत्यंत मोक्याच्या क्षणी मी कविता सोडली। कारणं अनेक होती, पण असो। आज त्याच्याबद्दल न बोललेलच बरं। कही व्यक्तिगत गोष्टी स्वतापर्यंतच बाळगाव्या।


१९९९ साली, म्हाज्या आईला ५० वर्षे पूर्ण झाली। त्या निमित्ताने लिहिलेली ही कविता। तेव्हा मी केवळ १५ वर्षांचा होतो। त्यामुळे कही चुका अपेक्षित आहेत। कृपया त्यावर दुर्लक्ष करावे


स्थल: म्हाजे निवासस्थान, नेवरा।



आज आईला पूर्ण झाली आहेत वर्षे पन्नास


प्रत्येकाच्या जीवनात असतं आईच महत्व खास


जीवनात आईंशिवाय कुणाचेच हालत नही पान


म्हणुनच मिलतो आईला जगभरात मान॥




आज सांगणार आहे मी तुम्हाला म्हाज्या आइबद्दल दोन शब्द


ते वाचून तुम्ही नक्कीच व्हाल स्तब्ध


किती करू मी म्हाज्या आईचे गुणगान


तिला आम्ही तिघे आहोत अजुन एकदम लहान॥



सर्वत्र लागतो आम्हाला आईच्या मदतीचा हात


तिच्यामुळेँच करू शकतो आम्ही जिवनातील संकटावर मात


ती झटत असते दिवसभर आमच्या पोटापायी


देविचेच दुसरे रूप आहे आमची आवडती आई॥


- गिरिराज पै वेर्णेकर